news
clock
कार्ला लेणीचा सर्वांगिण विकास करावा, 'आरपीआय'चे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांची मागणी

कार्ला लेणीचा सर्वांगिण विकास करावा, 'आरपीआय'चे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांची मागणी

 कार्ला लेणीचा सर्वांगिण विकास करावा, 'आरपीआय'चे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांची मागणी 

पिंपरी, ता. ९ - ऐतिहासिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कार्ला येथील बुद्ध लेणीच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कार्ला येथील बुद्ध लेणी हे प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळ असून येथे देश-विदेशातील पर्यटक, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेणीच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories