कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयचा निकाल ७७ टक्के

कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयचा निकाल ७७ टक्के

कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयचा निकाल ७७ टक्के

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ -  महापालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) यंदाचा निकाल ७७ टक्के लागला आहे. आयटीआयचा निकाल सोमवारी (दि. १०) जाहीर करण्यात आला.

कासारवाडी मुलींच्या आयटीआयमध्ये सहा ट्रेडमधून ७३ प्रशिक्षणार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ५६ जणी उत्तीर्ण झाल्या. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट आणि कॉस्मेटोलॉजी या ट्रेडमध्ये १७ विद्यार्थिनींपैकी प्रत्येकी १४ जणी उत्तीर्ण झाल्या व या दोन्ही ट्रेडचे निकाल ८२ टक्के लागले.

फॅशन डिझाइन अँड टेक्नॉलॉजी ट्रेडमध्ये १४ पैकी १२ जणींनी यश मिळवले असून निकाल ८६ टक्के लागला आहे. हॉस्पिटल हाऊसकीपिंग ट्रेडमध्ये ७ पैकी ६ जणी उत्तीर्ण झाल्यामुळे ८६ टक्के निकाल लागला आहे. डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ट्रेडमध्ये १४ पैकी ६ जणी यशस्वी झाल्या असून, निकाल ४३ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी कासारवाडी महिला 'आयटीआय'चा निकाल ९४ टक्के होता. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories