news
clock
सणासुदीनिमित्त कात्रज डेअरीची उत्पादने सवलतीच्या दरात

सणासुदीनिमित्त कात्रज डेअरीची उत्पादने सवलतीच्या दरात

सणासुदीनिमित्त कात्रज डेअरीची उत्पादने सवलतीच्या दरात

पुणे, ता. २० - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीकडून गुढीपाडवा, रमजान ईद आणि श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत श्रीखंड व आम्रखंडाच्या खरेदीवर प्रतिकिलो २० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

श्रीखंडाच्या अर्धा किलो पॅकवर १४० रुपयांऐवजी १० रुपयांची सूट देऊन १३० रुपये दर ठेवण्यात आला आहे, २५० ग्रॅम पॅक ७५ रुपयांऐवजी ७० रुपयांत उपलब्ध होणार आहे. आम्रखंडाच्या अर्धा किलो पॅकची किंमत १४५ रुपयांवरून १३५ रुपये करण्यात आली असून, २५० ग्रॅम पॅक ८० रुपयांवरून ७५ रुपयांत मिळणार आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.

सणासुदीच्या काळात गोड पदार्थांना मोठी मागणी असते. म्हणूनच, कात्रज डेअरीची दर्जेदार, शुद्ध व चविष्ट उत्पादने रास्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबवली आहे. ताज्या दुधापासून स्वच्छतेने तयार होणारी कात्रज डेअरीची उत्पादने चवीसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत, असे संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले. या सवलत योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि सणांचा गोडवा वाढवावा, असे आवाहन ढमढेरे यांनी केले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories