केशवनगर-चिंचवड येथील गावडे जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

केशवनगर-चिंचवड येथील गावडे जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

केशवनगर-चिंचवड येथील गावडे जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू 

पिंपरी, ता. १६ - केशवनगर-चिंचवड येथील गावडे जलतरण तलावात बुडून एक १७ वर्षीय मुलगा मरण पावला.  ​श्रवण समीर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो गोलांडे चौक-रहाटणी येथील द्वारकामाई सोसायटीत राहत होता. त्याच्या अशा निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. 

 श्रवण हा  पोहायला शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो मित्रांसोबत केशवनगर, चिंचवड येथील गावडे जलतरण तलावात पोहायला गेला होता. पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला, मात्र काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला आणि वर आलाच नाही. ​हा प्रकार सोबत असलेल्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तेथील जीवरक्षकांना (लाईफगार्ड्स) बोलावले. जीवरक्षकांनी श्रवणला पाण्यातून बाहेर काढले व  बेशुद्धावस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

​शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रशासनाने ​संबंधित निष्काळजी ठेकेदार आणि जीवरक्षकांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  श्रवण गायकवाड याच्या कुटुंबियांना महापालिकेकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories