पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व विशाल गायकवाड यांची बदली
May 16 2026
57
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व विशाल गायकवाड यांची बदली
पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व विशाल गायकवाड यांची बदली झाली आहे. त्या जागी उपायुक्त संजय सरगोंडा पाटील, धीरज पाटील आणि रोहिदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृहविभागाच्या वतीने शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांच्या स्वाक्षरीने बदली आदेश काढण्यात आले आहेत.
नवनियुक्त उपायुक्त संजय सरगोंडा-पाटील हे यापूर्वी नवी मुंबईचे उपायुक्त होते, धीरज पाटील हे यापूर्वी आणि सांगली तासगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य होते आणि रोहिदास पवार यांच्याकडे यापूर्वी राज्य लोहमार्ग अपर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी होती.
मावळते, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उपायुक्त विशाल गायकवाड यांची बदली पुणे शहर लोहमार्ग अपर पोलिस अधीक्षक पदावर झाली आहे. उपायुक्त शिवाजी पवार यांची मुंबई उपायुक्तपदी बदली झाली आहे.