खडकवासला धरण ७६% टक्के भरले
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज मंगळवार, दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता ७६% टक्के क्षमतेने भरले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या काही तासांत धरण ८०% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे कोणाही कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, ही विनंती, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले आहे.