news
clock
राज्यातील अनेक राजकीय नेते भोंदू खरातच्या नियमित संपर्कात, सूत्रांची माहिती

राज्यातील अनेक राजकीय नेते भोंदू खरातच्या नियमित संपर्कात, सूत्रांची माहिती

राज्यातील अनेक राजकीय नेते भोंदू खरातच्या नियमित संपर्कात, सूत्रांची माहिती

पुणे, ता. ३१ - भोंदू अशोक खरात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील ४० ते ४५ राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते. खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काही राजकीय नेते महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्यापूर्वी अशोक खरातचा सल्ला घ्यायचे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीही काही नेते शुभ वेळ आणि तारीख विचारण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधायचे. 

खरातने अनेक राजकीय नेत्यांचे मोबाईल क्रमांक कोडवर्डमध्ये सेव्ह करुन ठेवले होते, संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत. 

विशेष तपास पथकाला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून मोबाईल क्लोन डेटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत, अशी माहितीही सू्त्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories