news
clock
असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे  - ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे

असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे - ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे

असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे  - ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे 

भोंदू खरात प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप धुडकावून लावले

पुणे, ता. ३१ - काल सोमवारी (ता. ३०) सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन  भोंदू अशोक खरात प्रकरणात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव जोडले असल्याचे सांगितले. त्यानंतर, नीलम गोऱ्हे यांनी निवेदन प्रसिद्ध करुन देसाई यांनी केलेले आरोप धुडकावून लावले आहेत. 

निवेदनामध्ये गोऱ्हे यांनी, '' आरोपांचा प्रकार पूर्णतः कपोलकल्पित आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात नावाच्या व्यक्तीला मी कधीही भेटले नाही. चार दशकांपासून मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पारदर्शकपणे कार्यरत असून, माझ्या कामाची पद्धत व तत्त्वे जनतेपासून कधीही लपवलेली नाहीत. कुटुंबातून मिळालेल्या प्रगत विचारसरणीच्या संस्कारांमुळे अंधश्रद्धा किंवा बुवाबाजीपासून दूर राहण्याची भूमिका सातत्याने जपली आहे. राजकारणात प्रवेश करताना महिलांची प्रगती व सामाजिक न्याय हेच माझे प्रमुख ध्येय राहिले असून, कोणतेही पद मिळवण्यासाठी कधीही तथाकथित गुरु किंवा बुवांची मदत घेतलेली नाही. '', असे स्पष्ट केले आहे. 

''माझी अलीकडील संसदीय कामगिरी, सातारा येथील पोलिस अधीक्षक निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली प्रशंसा काहींना सहन झालेली नाही. त्यामुळेच पुणे महापालिकेत अपयशी ठरलेल्या काही असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे.'', असा प्रत्यारोप गोऱ्हे यांनी केला आहे. खोट्या प्रचाराला बळी न पडता पुढेही आपले कार्य नेहमीप्रमाणेच सुरु राहील, अशा बदनामीकारक प्रयत्नांना सर्वतोपरी उत्तर देण्यास मी सक्षम आहे, असेही नीलम गोऱ्हे यांनी ठामपणे सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories