पतसंस्थेच्या संचालकांकडून ठेवीदारांची मोठी फसवणूक, ६ कोटी ५३ लाखांहून अधिक रकमेचा अपहार, ३६ जणांवर गुन्हा दाखल
पतसंस्थेच्या संचालकांकडून ठेवीदारांची मोठी फसवणूक, ६ कोटी ५३ लाखांहून अधिक रकमेचा अपहार, ३६ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १६ - ठेवीदारांची फसवणूक करुन तब्बल ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२/- रुपये रकमेचा अपहार पतसंस्थेच्या संचालक मंडळावरील सदस्यांनीच केला आहे. फसवणूकीचा हा प्रकार खेड तालुक्यातील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत -सन २०१३-१४ ते २०१७-१८ या कालावधीमध्ये घडला आहे. या प्रकरणी एकूण ३६ जणांवर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, सुनिल मथुरा काळे (वय ५५ वर्षे, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतसंस्थेचे संचालक व इतर कही जण अशा एकूण ३६ जणांनी कट रचला. स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, जामिनकी कर्ज, वाहन तारण कर्ज, ठेवतारण कर्ज याबाबत जमा पावत्यांच्या रक्कमा रोजच्या व्यवहारात जमा न घेणे, बँकेतून आणलेल्या रोख रक्कमा जमा न घेणे, बँक भरणा नावे दर्शविणे मात्र बँकेत जमा नोंद नसणे, बचत ठेव खात्यामधून बोगस सहीने रक्कमा काढणे, बोगस खर्च नावे टाकणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत गुंतवणूक दर्शविणे मात्र संस्था दप्तरी काही पुरावे नसणे, दैनंदिन ठेव कमी शिल्लक असतांना जादा रक्कम नावे टाकून हात शिल्लक घटविणे, रोजकिर्दीस आरंभी शिल्लक कमी घेणे अशा विविध प्रकारे ठेवीदारांची फसवणूक केली. खोटे बनावट दस्तऐवज बनवून ठेवीदारांचा विश्वासघात केला. यात आरोपींनी रुपये ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ०४२/- या रक्कमेचा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता अपहार करुन भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार, खातेदार, सभासदांची फसवणूक केली.
आरोपींवर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४०६,४०९, ४२०, ४६७,४६८,४७१, १२० (ब) महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे - १. रामदास हिरामण कड, २. तुकाराम पिराजी टोपे, ३. किसन सोपान गारगोटे ४. बाळासाहेब पंडीत गारगोटे ५. रविंद्र नामदेव गारगोटे, ६ अनिल गोविंद टोपे, ७. शिवाजी बाबुराव जरे, ८. काळुराम पांडुरंग टोपे, ९. राजाराम किसन टोपे, १० सुरेश रंगनाथ लोखंडे, ११ दत्तात्रय वाल्मिक गोरे, १२. शांताराम बापू जगताप, १३ विमल बबन गारगोटे, १४. रामदास ज्ञानेश्वर जाधव, १५ गोरख भागुजी टोपे, १६ सुरेखाताई लक्ष्मणराव टोपे १७. मारुती ज्ञानोबा गारगोटे, १८. राहुल रामदास टोपे, १९. दत्तात्रय संतु टोपे, २०. अंकुश रामदास जरे, २१ निलेश हनुमंत टोपे, २२ सुरेश शिवाजी टोपे, २३. संतोष दत्तात्रय टिपरे, २४. सुरेखा लहू गारगोटे, २५ सुरेखा संजय टोपे, २६ काळूराम लक्ष्मण गारगोटे, २७. शिवाजी दगडू टोपे २८ सुरज लक्ष्मण टोपे, २९ सुरेखा लक्ष्मण टोपे, ३०. शिवाजी किसन भोंडवे, ३१. सारिका रोहिदास गारगोटे, ३२. रोहिदास तुकाराम गारगोटे, ३३. सुरेखा सुरेश लोखंडे, ३४. अनिता काळुराम गारगोटे, ३५. विशाल दत्तात्रय पवळे, ३६. रामदास संतु टोपे (सर्व रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, आरोपी अटक नाहीत.)