news
clock
पिंपरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडले पिस्तूल

पिंपरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडले पिस्तूल

 पिंपरीत अल्पवयीन गुन्हेगाराकडे सापडले पिस्तूल 

पिंपरी, ता. १६ - देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराला पोलिसांनी बुधवारी (ता. १५)  पिंपरी परिसरातून ताब्यात घेतले. तपासात हे पिस्तूल व काडतुस त्याने ५४ वर्षीय इसमाकडून आणल्याचे सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन गुन्हेगाराने रुपये ५० हजार ५०० /- किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल बाळगले होते.  कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई असताना हे पिस्तूल त्याच्याकडे आढळले. तपास करताना हे पिस्तूल त्याने मध्यप्रदेशात राहात असलेल्या प्रतापसिंग (वय ५४ वर्षे) याच्याकडून आणल्याचे सांगितले. 

पिस्तूल देणारा इसम व अल्पवयीन गुन्हेगार यांच्यावर बुधवारी (ता. १५) पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



-

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories