news
clock
ड्रेनेच्या कामासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने कुटुंबाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ड्रेनेच्या कामासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने कुटुंबाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ड्रेनेच्या कामासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने कुटुंबाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २० - सोसायटीच्या ड्रेनेजच्या कामासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन तिघांनी एका कुटुंबियांना शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील बेलवाडी येथील दत्तगुरु हौसिंग सोसायटीत गुरुवारी (ता. १९) घडली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत, संबंधित महिलेने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मारहाणीच्या घटनेमध्ये नितीनकुमार प्रकाश पाटील (वय ४१ वर्षे) , शिवाजी नामदेव पठाडे व महिला आरोपी आहे. 

सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आरोपी नितीनकुमार प्रकाश पाटील (वय ४१), शिवाजी नामदेव पठाडे व एका महिला आरोपीने ड्रेनेज शुल्क का दिले नाही, यावरून वाद घातला.

फिर्यादींच्या राहत्या घरासमोर आरोपींनी सोसायटीच्या ड्रेनेजच्या कामासाठी कॉन्ट्रिब्युशन का दिले नाही असे म्हणून फिर्यादी महिलेला, तिचे पती माणिक सुभाषराव धुळे व वडिल बापुराव वैजनाथराव शिंदे (वय ६७ वर्षे) यांना शिविगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण केली. तसेच एका आरोपीने दगड माणिक धुळे यांच्या नाकावर मारुन त्यांना जखमी केले आहे. 

पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुरुवारी (ता. १९) भारतीय न्याय संहिता कलम  ११८ (१), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories