पत्नीची बदनामी केल्याच्या कारणाने तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली
पिंपरी, ता. ५ - ''माझ्या पत्नीची बदनामी करतो.'' या कारणावरुन एका तरुणाने दुसऱ्या ओळखीच्या तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली मारुन त्याला जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील मेदनकरवाड येथे गुरुवारी (ता. ४) घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत, रवींद्र बाळासाहेब मेदनकर (वय ३८ वर्षे, नोकरी, मेदनकरवाडी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक दादाजी नवसारे (वय ४० वर्षे, मेदनकरवाडी, खेड) याच्यावर दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रवींद्र मेदनकर, ज्ञानेश्वर मेदनकर, विठ्ठल मेदनकर, विजयनाथ मेदनकर विजय मेदनकर असे गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी अचानक आरोपी तेथे आला व रवींद्र मेदनकर यांना त्याने शिविगाळ केली. ''माझ्या बायकोची बदनामी करतो.'', असे म्हणत काचेची बाटली रवींद्र यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले.
आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपीवर दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ४) भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे आणि भारतीय दंड विधान कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- , Khed taluka crime, Medankarwadi incident, South Chakan Police Station
- , wife defamation dispute, assault case, glass bottle attack, man injured in attack
- आरोपी दीपक नवसारे,
- तरुण जखमी, मेदनकरवाडी घटना, खेड तालुका, दक्षिण चाकण पोलिस ठाणे, मारहाण प्रकरण
- पत्नीची बदनामी, बदनामीच्या कारणावरून हल्ला, काचेच्या बाटलीने हल्ला