१२ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करुन आरोपी फरार

१२ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करुन आरोपी फरार

१२ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करुन आरोपी फरार 

पिंपरी, ता. १६ - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून १२ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार ९०० /- रुपयांची फसवणूक करुन आरोपी फरार झाला आहे. फसवणूकीचा हा प्रकार ४ एप्रिल २०२४ ते आत्तापर्यंत किवळे येथील एन. बी. एम. ट्रेडर्समध्ये घडला आहे. आरोपी नितान भास्कर माने (रा. किवळे) याच्यावर शुक्रवारी (ता. १५) देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणूकीबाबत एका इसमाने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी व इतर ११ गुंतवणूकदारांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूकीकरीता  प्रती महिन्याचे ५ टक्के जादा परताव्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करुन शेअर्स मार्केटच्या गुंवतवणूकीकरीता रक्कम १५ लाख रुपये घेतले. फिर्यादी यांना ९ लाख ८ हजार ५००/- रुपये परत केले. फिर्यादीने गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी ५ लाख ९१ हजार ५००/- रुपयांचा अपहार केला. अशाच प्रकारे इतर ११ गुंतवणूकदाराच्या १ कोटी १६ लाख ८४ हजार ४००/- रुपयांचा अपहार केला. 

यात, १२ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी २२ लाख ७५ हजार ९००/- रुपयांची फसवणूक आरोपीने केली आहे आणि स्वतःचे अस्तित्व लपविण्यासाठी मोबाईलनंबर बंद करुन तो कुठेतरी पळून गेला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीवर देहुरोड पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) व बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ कलम ३/२१,४/२२, ४/२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories