राज्यात शासकीय-खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरु

राज्यात शासकीय-खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरु

राज्यात शासकीय-खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरु

पुणे, ता. १६ -  राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२६ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया २१ मेपासून सुरु होत आहे.  प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका दिनांक २१ मे, २०२६ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दिनांक २१ मे  २०२६ पासून रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्‌नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत जिल्हा / प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी, असे प्रशासनाने सांहितले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाव्दारे इयत्ता १० वी ची गुणपत्रिका संबंधीत शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल.


-: प्रवेशाचे वेळापत्रक- 

१)  ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे -  ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे - 

२१ मे २०२६, सकाळी ११ पासून सुरु

२)  प्रवेश अर्ज निश्चित करणे - अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित (Confirmation) करणे - २१ मे २०२६, सकाळी ११:०० वाजेपासून सुरु 

३)  पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य  सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन सादर करणे - १ जून, २०२६ सकाळी ११:०० वाजेपासून सुरु 

- प्रवेशासाठी संकेतस्थळ - https://admission.dvet.gov.in, www.dvet.gov.in, 

[email protected] 


- अर्ज करण्याची पध्दत -

१. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीयेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्विकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे / पडताळणी / स्विकृती आणि निश्चिती करु शकतील.

२. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.

३. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातुन भरता येईल. सर्व औ.प्र.संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

४. प्रवेश अर्जात अचूक माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन प्रवेश अर्ज शुल्क जमा करावे.

५. प्रवेशअर्ज शुल्क - १) राखीव प्रवर्ग : रु.१००, २) अराखीव प्रवर्ग : रु.१५०, ३) महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार : रु.३०० आणि ४) अनिवासी भारतीय उमेदवार (Non : रु.५००

६. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी व प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश अर्जात तसेच, संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली व माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

७. प्रवेश अर्ज निश्चित करणे 

८. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल

९. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर हरकती नोंदविणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.

१०. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्ड व्दारे प्रवेश करुन "Option Form" व्दारे सादर करावेत.

११. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेतुन बाद होईल.

१२. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखिल दि.२१ मे, २०२६ पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.

१३. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र त्यांच्या प्रवेश खात्यात उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी निवड झालेल्या औ.प्र. संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे.

१४. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातिल दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज /कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतुन बाद करण्यात येईल.

--------------------------------------------------------------------------------------------------------------






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories