विविध मागण्यासांठी भूमीअभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन, २७ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा...

पिंपरी, ता. २१ - कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, विभागातील खासगीकरणाचा निर्णय रद्द करणेबाबत, सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात यावा, मोजणी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता ठरवून, वेतनामध्ये समाविष्ट करावे, ई-मोजणी व्हर्जन २ सॉफ्टवेअर हे व्हर्जन १ प्रमाणे सुटसुटीत व वापरास सोपे करणे, चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची व अमानवी पद्धत बंद करावी....या मागण्यांसाठी भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या बुधवारपासून सबंध जिल्ह्यात आंदोलन केले आहे.

भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने बुधवारपासून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कर्माचाऱ्यांनी जिल्हाभरात सगळीकडे मोजणी साहित्य जमा केले. काळ्या फिती लावत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हाभरात जमीन मोजणीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. 

भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक सुरज रामटेके, गणेश माशाळकर, सुधीर गाडेकर, शशांक नलावडे, विनोद दामले, विवेक जाधव, दत्तात्रय माने, देवीदास घोलप, विशाल शिंपले, सुवर्णा भिसे, वनिता गायकवाड, सपना भोईटे, सुचिता भोकरे यांनी आंदोलन केले. भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षकांना निवेदन दिले. शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन पूर्तता करावी, अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी केली आहे. 

२७ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा...
सूरज रामटेके म्हणाले, ''भूमिअभिलेख कृती समितीच्या वतीने राज्यभरात टप्प्याटप्याने आंदोलन करणार आहोत.  शुक्रवारपासून मोजणी काम बंद ठेवून काळ्या फिती लावून फक्त कार्यालयीन कामकाज केले जाईल. त्यानंतर सामूहिक रजा आंदोलन करणार आहोत. दिनांक २७ फेब्रुवारीला जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन केले जाणार आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance