news
clock
पावणे तीन लाखांचे हातभट्टीच्या दारुचे रसायन नष्ट, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पावणे तीन लाखांचे हातभट्टीच्या दारुचे रसायन नष्ट, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पावणे तीन लाखांचे हातभट्टीच्या दारुचे रसायन नष्ट, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई 

पिंपरी, ता. २४ - मौजे घाडगे वस्ती, कुरुळी (ता. खेड) येथे हातभट्टीच्या दारुचे २ लाख ७५ हजार रुपयांचे रसायन दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. २३) नष्ट केले. या प्रकरणी आरोपी रोहीत राठोड (रा. मोई, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथील मौजे घाडगे वस्ती आरोपी याने गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे ५,५०० लीटर कच्चे रसायन व १० हजार ५००/- रुपये किंमतीची १०५ लीटर तयार गावठी दारु बाळगली होती. हे सर्व साहित्य पोलिसांच्या पथकाने नष्ट केले आहे. 

सोमवारी पोलिसांनी तेथे अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा झाडाझुडप्याच्या अडोश्याने पळून गेला आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ख) (च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories