युवक काँग्रेसच्या 'संविधान लीडरशिप प्रोग्राम' चे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्घाटन, तरुणाईमध्ये नेतृत्वगुणांच्या विकासाचे उद्दीष्ट
युवक काँग्रेसच्या 'संविधान लीडरशिप प्रोग्राम' चे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्घाटन, तरुणाईमध्ये नेतृत्वगुणांच्या विकासाचे उद्दीष्ट
पिंपरी, ता. १७ - तरुणाईमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये 'संविधान लीडरशिप प्रोग्राम' राबवला जाणार आहे. या कार्यक्रमांचा प्रारंभ गुरुवारी (ता. १६) भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व या अभियानासाठीचे प्रभारी गौरव चौधरी यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. अधिकाधिक तरुण-तरुणींनी या कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.
पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये 'संविधान लीडरशिप प्रोग्राम'ची सुरवात झाली. कार्यक्रमाची सविस्तर माहिती चौधरी यांनी दिली. ते म्हणाले, '' तरुणाईला राजकीय क्षेत्रात आणून आणि संविधानाशी जोडून तरुणाईचे नेतृत्व कौशल्य विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी सरकारच्या चुकीच्या धोरणांविषयी मांडलेले मत आणि स्थानिक अडचणी देखील आज सोशल मीडियावर मांडल्या जात आहे. याचाच धागा पकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, स्थानिक नागरिक, कार्यकर्ते यांना युवक काँग्रेस राजकीय क्षेत्रातील मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करुन घेईल. समाजातील प्रश्न मांडताना त्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये युवक कॉंग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.''
युवक कॉंग्रेसने जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकावर 'मिसकॉल' देऊन किंवा' क्यू आर कोड' स्कॅन करुन त्यात आपली माहिती भरुन 'संविधान लीडरशिप प्रोग्राम'मध्ये या सहभागी होता येईल. संपूर्ण राज्यभरामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, असे गौरव चौधरी यांनी सांगितले.
यावेळी, पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व शहर निरीक्षक सत्यजित बिरादार, उपनिरीक्षक विकास सुपणार प्रदेश सचिव उमेश कंधारे, स्वप्निल बनसोडे विशाल कसबे, अजिंक्य देसाई ,मयूर रोकडे, शोएब कुरेशी, रोहित शेळके, जय ठोंबरे, अक्षय शिंगाडे यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
- गौरव चौधरी, Gaurav Chaudhary, युवक सहभाग, Youth Participation, राजकीय प्रशिक्षण, Political Training
- सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, Social Media Influencers,
- नेतृत्वगुण विकास, Leadership Development, तरुणाई, Youth, राजकारण, Politics, संविधान, Constitution,
- युवक काँग्रेस, Youth Congress,
- संविधान लीडरशिप प्रोग्राम, Constitution Leadership Program,