शिरगाव परिसरात दारु तयार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ११ - दारु तयार करणाऱ्या महिलेवर शुक्रवारी (ता. १०) शिरगाव पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) प्रमाणे गुन्हा दाखव केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच ती महिला तेथून पळून गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परिसरात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ मधील पोलीस अंमलदार घटनास्थळी गस्त घालत होते. पुसाणे गाव हद्दीतील ओढ्यावरील बंधाऱ्याजवळ सायंकाळी सुमारे ६.५५ वाजता एक महिला अवैध दारुनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे गूळमिश्रीत रसायन तयार करताना आढळली. हे रसायन ४२,००० रुपये किंमतीचे होते. पोलीस आल्याची चाहूल लागताच तिने ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांचा फायदा घेत पळ काढला.
सदर महिलेवर शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.