news
clock
लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगारावर गुन्हा

लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगारावर गुन्हा

लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगारावर गुन्हा 

पिंपरी, ता. २  – शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करुन कोयता बाळगणाऱ्या १९ वर्षीय तडीपार गुन्हेगारावर शनिवारी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी नंदू शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलीस चौकशीत आढळले की, आरोपी बालाजी शिंदे याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही त्याने शस्त्र बाळगण्यास मनाईच्या आदेशाचे उल्लंघन करुन लोखंडी कोयता बाळगला होता. आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१),(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories