मौजे लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळांना लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश रद्द
पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - मुसळधार पावसामुळे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.
लोणावळा ग्रामीण परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा व तुंग किल्ले, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण आदी पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कलम १६३ लागू करण्यात आले होते.
मात्र, सध्या पावसाचा वेग कमी झाला असून जनजीवन सुरळीत सुरू असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन ६ जुलै २०२६ रोजीचा आदेश रद्द करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केली आहे.
- भाजे लेणी, Bhaja Caves, भाजे धबधबा, Bhaja Waterfall, लोहगड किल्ला, Lohagad Fort, विसापूर किल्ला, Visapur Fort, तिकोणा किल्ला, Tikona Fort, तुंग किल्ला, Tung Fort, टायगर पॉईंट, Tiger Point
- मुसळधार पाऊस, Heavy Rain, पर्यटन, Tourism, पर्यटक, Tourists, एकवीरा देवी मंदिर, Ekvira Devi Temple, कार्ला लेणी, Karla Caves
- आदेश रद्द, Order Cancelled, जिल्हाधिकारी, District Collector, जितेंद्र डूडी, Jitendra Dudi, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, कलम १६३, Section 163, पावसाळा, Monsoon
- लोणावळा, Lonavala, लोणावळा ग्रामीण, Lonavala Rural, पर्यटनस्थळे, Tourist Places, प्रतिबंधात्मक आदेश, Preventive Order