शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी लोणावळ्यातील आठवडे बाजार बंद राहणार

शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी लोणावळ्यातील आठवडे बाजार बंद राहणार

 शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी लोणावळ्यातील आठवडे बाजार बंद राहणार 

पिंपरी, ता. ५ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या, शुक्रवारी (ता. ६) लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.  लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

शिवजयंतीनिमित्त शहरात शिवज्योत मिरवणूक भांगरवाडी रस्ता तसेच हनुमान टेकडी रस्ता मार्गे काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची नागरीकांनी नोंद घ्यावी,  नगरपरिषद प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories