news
clock
शिवजयंतीनिमित्त ६ मार्चला सांयकाळी सांगवीमध्ये वाहतूक मार्गात बदल

शिवजयंतीनिमित्त ६ मार्चला सांयकाळी सांगवीमध्ये वाहतूक मार्गात बदल

शिवजयंतीनिमित्त ६ मार्चला सांयकाळी सांगवीमध्ये वाहतूक मार्गात बदल 

पिंपरी, ता. ५ - दिनांक ६ मार्चला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. त्यामुळे, पिंपळे गुरव कमान ते रामकृष्ण मंगल कार्यालय रस्त्यावर मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांमध्ये नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होणार असल्याने परिसरात वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, त्याबाबतचे आदेश  पिपंरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे  पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.

सांगवी वाहतूक विभाग हद्दित ६ मार्चला मिरवणुक मार्गावर ६ सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस मनाई आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने या बदलातून वगळली आहेत.

असे आहेत वाहतूकीतील बदल -

पिंपळे गुरव कमान ते रामकृष्ण मंगल कार्यालय चौक येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करणेत येत आहे.

पर्यायी मार्ग :- १) रामकृष्ण मंगलकार्यालय चौक कडून ६० फुटी रोडने इच्छित स्थळी जातील.

                    २) रामकृष्ण चौकाकडून काटेपुरम चौक मार्गाने इच्छीत स्थळी जातील.

                    ३) पिंपळे गुरव कमान कडून डायनासोर गार्डन मार्गे इच्छितस्थळीत जातील.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories