news
clock
प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा आईनेच केला खून, आईला व फरार प्रियकरला अटक

प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा आईनेच केला खून, आईला व फरार प्रियकरला अटक

 प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा आईनेच केला खून, आईला व फरार प्रियकरला अटक 

पिंपरी, ता. १८ - प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचा आईने तिच्या प्रियकाराच्या निर्घृण खून केल्याची घटना खेड तालुक्यातील कुरळी येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. या क्रूर आईला पोलिसांनी अटक केली होती पण तिचा प्रियकर फरार झाला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने या आरोपी, गुन्हेगार प्रियकराचा शोध घेऊन १७ एप्रिलला त्याला अटक केली आहे. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिनाकं ८ एप्रिलला २०२६ भारतीय न्याय संहिता चे कलम १०३ (१),२३८,६१ (२), ३ (५) अन्वये ६ वर्षीय मुलाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात यातील महिला आरोपी बसरिन मेहबुब शेख (वय २७ वर्ष, रा. ता. अंबाजोगाई जि. बीड) हिचे फरार आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबध होते. 

सदर दोघे हे अंबाजोगाई येथे शेजारी राहतात. यातील महिला विवाहीत असून तिला तीन अपत्ये आहेत. यातील मयत मुलगा नामे आवेज (वय ६ वर्ष) याच्यासह मागील चार महीन्यापूर्वी ती महिला प्रियकर रामसह कुरुळी (ता. खेड) येथे राहायला आली होती. या दोघांच्या प्रेमसंबंधात आवेज हा अडथळा ठरत होता. याच कारणावरुन ४ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास बसरिन व रामने संगनमत करुन आवेजला बाथरुम मधील पाण्याचे बादलीत डोके बुडवून आणि त्याचे डोके भिंतीवर व जमीनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. सदर हत्येनंतर गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी सदर घटनेला नैसर्गिक मृत्युचे स्वरुप देण्यासाठी आवेजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बनाव केला. आवेजचा मृतदेह यातील या दोघांनी रामच्या  कारमधुन (धर्मापुरी ता. परळी जि. बीड) येथे नेला. 

 फिर्यादी इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांना माहीती दिली.  मयत आवेजच्या डोक्यावर व पाठीवर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या.  बसरीनच्या संशयास्पद हालचालींमुळे व शवविच्छेदन अहवालामुळे बसरिनकडे सखोल चौकशी केली असता, तिने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. 

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत आवेजची आई बसरिन शेख ही अटकेत आहे. तिचा प्रियकर राम फरार होता. त्याचा तिरुपती, आंध्रप्रदेश व अंबाजोगाई येथे पाठलाग करुन १७  एप्रिलला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली.  न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्तृसारंग अव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर, सहा पोलीस आयुक्त, महाळुंगे विभाग सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, तपास पथकाचे सपोनि पुल्ली, सपोफौ चौधरी, अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड केली आहे. सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे करीत आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories