news
clock
मोहनगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पध्दतीने नूतनीकरण पूर्ण, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मोहनगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पध्दतीने नूतनीकरण पूर्ण, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

नागरिकांना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील - महापौर रवी लांडगे

मोहनगर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पध्दतीने नूतनीकरण पूर्ण, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी, ता. १८ - ''पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त क्रीडा सुविधा देण्याचा त्याचबरोबर क्रीडा साधने आधुनिक व दर्जेदार करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. मोहननगर येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे नागरिकांना आणि खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होतील.'', असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले, या कामाचे लोकार्पण महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, शंकर जगताप यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य प्रमोद कुटे, धर्मपाल तंतरपाळे,नगरसदस्या वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड शहरात क्रीडा सुविधा अधिक सक्षम आणि जागतिक दर्जाच्या करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मोहननगर येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण हे केवळ दुरुस्तीचे काम नसून, खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. या सुधारित सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सरावाची संधी मिळेल, स्पर्धात्मक क्षमताही वाढेल आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडण्यास मदत होईल.'' 

 महानगरपालिकेकडून क्रीडा क्षेत्रासाठी उभारण्यात येणाऱ्या अशा सुविधा या केवळ पायाभूत कामे नसून, त्या शहराच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठीची गुंतवणूक आहेत. मोहननगर जलतरण तलावाचे नूतनीकरण ही त्याचीच प्रचिती असून, या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून स्थानिक खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.    आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही मनोगत व्यक्त केले.

''छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम २० जून २०२४ पासून सुरु झाले होते त्यामध्ये जलतरण तलावाची खोली कमी करणे, तलाव आच्छादित करणे, वॉटरप्रूफिंग, नवीन फ्लोरिंग, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, अंतर्गत सुशोभीकरण, विद्युत विषयक कामे, आधुनिक फिल्टरेशन प्लँट बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच रंगरंगोटी अशी विविध कामे करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे रुपये ३ कोटी ९१ लाख इतका खर्च आलेला आहे. या सर्व कामांमुळे जलतरण तलाव अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक बनला असून, नागरिकांना आणि खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.'', अशी माहिती उप आयुक्त पंकज पाटील यांनी यावेळी दिली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज पाटील व सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. वैशाली काळभोर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories