विशालनगरमध्ये लव्ह मॅरेजच्या रागातून हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप

विशालनगरमध्ये लव्ह मॅरेजच्या रागातून हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप

विशालनगर | 8 सप्टेंबर 2026 : लव्ह मॅरेजचा राग मनात धरून हॉटेल व्यावसायिकाला पार्किंगमध्ये अडवत मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अंदाजे 3 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावल्याची घटना विशालनगरमध्ये घडली. याप्रकरणी चौघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल अण्णासाहेब वीर (वय 33, रा. विशालनगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संध्यानगरी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काळुराम लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे सर्व रा. कासारवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी हे फिर्यादीचे मेव्हणे असून बहिणी सोबत लव्ह मॅरेज केल्याचा जाब विचारत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी वस्तू, बॉटल आणि दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीदरम्यान एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 511/2026 नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories