म्हाडाचे २ फ्लॅट कमी किंमतीत देण्याच्या आमिषाने महिलेला २० लाख ८५ हजारांना गंडा

म्हाडाचे २ फ्लॅट कमी किंमतीत देण्याच्या आमिषाने महिलेला २० लाख ८५ हजारांना गंडा

म्हाडाचे २ फ्लॅट कमी किंमतीत देण्याच्या आमिषाने महिलेला २० लाख ८५ हजारांना गंडा

पिंपरी, ता. १८ - म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून चिंचवडमधील एका महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.   ही फसवणूक सन २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली आहे. आरोपीवर रविवारी (ता. १७) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, उमाकांत डाके (वय ६०), जया उमाकांत डाके (वय ५६) आणि शुभम उमाकांत डाके (वय २९) यांनी संगणकाद्वारे डांगे चौक येथील नाईटिंग ग्रिन सोसायटीमध्ये म्हाडाचे दोन फलॅट कमी किमतीत देण्याचे आमिष महिलेला दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी महिलेने त्यांना २०,८५,०००/- रुपये सुपूर्द केले. मात्र, आरोपींनी फ्लॅट दिले नाही आणि पैसे परतही केले नाहीत.

या प्रकरणी  आरोपींवर चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३१६(२), ३१८(२) तसेच ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटक नाहीत. पोलिस तपास करत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories