महाळुंगेतील कंपनीत २.३३ लाखांचे ॲल्युमिनियम चोरीला; दोघांवर गुन्हा

महाळुंगेतील कंपनीत २.३३ लाखांचे ॲल्युमिनियम चोरीला; दोघांवर गुन्हा

महाळुंगे | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महाळुंगे इंगळे परिसरात एका कंपनीतील २ लाख ३३ हजार ६६६ रुपये किमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांनी संगनमत करून कंपनीचा विश्वास संपादन करत साहित्याची चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विराज आनंद महाळुंगकर (वय ३३ वर्षे, बाणेर रोड, ता. हवेली, जि. पुणे; मूळ राहणार महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथील सद्गुरू ऑटो कंपोनेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी  शिवम अच्छेलाल यादव (वय २६ वर्षे, राहणार महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे; मूळ उत्तर प्रदेश) आणि ड्रायव्हर आशिष श्रीनिवास साकेत (वय २२ वर्षे, राहणार महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे; मूळ मध्य प्रदेश) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी संगनमत करून कंपनीतील Aluminium Ingot_ADC12 प्रकारचे साहित्य चोरले. चोरी झालेल्या साहित्यामध्ये १९४ नग ॲल्युमिनियम इंगॉट असून, त्यांचे एकूण वजन अंदाजे ७५२ किलो आहे.

या साहित्याची एकूण किंमत २ लाख ३३ हजार ६६६ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories