मौजे महाळुंगे येथे ६० वर्षीय इसमाकडून ३७ हजार ५५०/- रुपयांचा गांजा जप्त

मौजे महाळुंगे येथे ६० वर्षीय इसमाकडून ३७ हजार ५५०/- रुपयांचा गांजा जप्त

मौजे महाळुंगे येथे ६० वर्षीय इसमाकडून ३७ हजार ५५०/- रुपयांचा गांजा जप्त 

पिंपरी, ता. २७ - मौजे महाळुंगे (ता. खेड) येथे ६० वर्षीय इसमाकडून ३७ हजार ५५०/- रुपये किंमतीचा ७५१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या इसमाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २६) करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गहिनीनाथ लक्ष्मण जोशी (वय ६० वर्षे, रा. ता. खेड) याने ३७,५५०/- रुपये किंमतीचा ७५१ ग्रॅम गांजा  सदगुरु मिसळ जवळ, पानटपरीमध्ये बाळगला होता. पोलिसांनी त्याच्याजवळचा माल ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपीवर  दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories