आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना अटक

आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना अटक

आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना अटक 

भोसरी एम.आय.डी.सी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी

पिंपरी, ता. २७ - आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचा १३ मे रोजी अज्ञात व्यक्तिंनी मोशी परिसरात असलेल्या युवराज रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजता धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे व गोपनिय माहितीद्वारे तपास करुन १५ मे २०२६ रोजी अटक केली आहे व आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे.  भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मोरे यांचा खून झाल्यानंतर  नागनाथ कुंडलिक चाटे (रा.  कुरळी, ता. खेड) तक्रार दिली होती.  एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ४९,१०३(१),४९, ६१ (२),२३८ (a),३ (५) आर्म अॅक्ट ४, (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे, क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 सदर गुन्हयाचा तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती घेऊन केला.  आरोपी १) नागेश लक्ष्मण काळे (वय २९ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत कॉलनी नं.२ बुध्द विहार जवळ, भोसरी), २) अजय सर्जेराव गायकवाड (वय २० वर्षे), ३) अजय सिकंदर आव्हाड (वय २७ वर्षे) व ४) दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३० वर्षे, रा. आंबेडकर वसाहत लांडेवाडी, भोसरी) यांना  १५ मे २०२६ रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. चा आरोपींना  न्यायालयाने दिनांक १६/०५/२०२६ ते २५/०५/२०२६ रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी  नितीन दिगंबर धोत्रे (रा. भोसरी) याचा शोध घेण्यासाठी  वेगवेगळी तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत.

सदरची कामगिरी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)  सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलिस उप आयुक्त परिमंडळ - ३  मारुती जगताप,  माजी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, माजी सहाय्य पोलिस आयुक्त एम.आय.डी.सी भोसरी विभाग सुधाकर यादव, एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस अंमलदार प्रशांत सोरटे, संजय जरे चंद्रकांत गवारी, गणेश बोऱ्हाडे, चंद्रकांत असवले, स्वप्नील शेलार, राहुल लाखंडे, प्रविण मुळुक, बाजीराव सानप, स्वप्नील झनकर, नितीन खेसे, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, गजानन आढे, अशिष गोपी, सुहास कोंडेदेशमुख, गोटीराम पाखरे, राजू जाधव यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories