महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश, ३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश, ३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश, ३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

पिंपरी, ता. २२ - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या उर्दू शाळांमधील ३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एका विद्यार्थ्याने यश मिळवले आहे.

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या ३५ विद्यार्थ्यांमध्ये ५ विद्यार्थी महापालिकेच्या जाधववाडी  प्राथमिक उर्दू शाळेतील आहेत, पाच विद्यार्थी काळेवाडी  प्राथमिक उर्दू शाळेतील आहेत,  प्रत्येकी ४ विद्यार्थी थेरगाव, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि रुपीनगर  प्राथमिक उर्दू शाळेतील आहेत, प्रत्येकी ३ विद्यार्थी लांडेवाडी व चिंचवडगाव  प्राथमिक उर्दू शाळेतील आहेत. श्रमिकनगर येथील प्राथमिक उर्दू शाळेतील २ व नेहरुनगरच्या प्राथमिक उर्दू शाळेतील १ विद्यार्थी यांचा समावेश आहे. थेरगावमधील शाळेतील एका विद्यार्थ्याने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

या शिष्यवृत्ती परिक्षेसाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेतली. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दर रविवारी चार तासांचे विशेष 'संडे क्लास' वर्ग घेण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक मोमीन मोहसीन, वर्गशिक्षक मोमिन अबरार, फसीउद्दीन शेख, यासिर शेख, नजमा शेख यांनी विद्यार्थ्यांची  वैयक्तिक लक्ष देऊन तयारी करुन घेतली. 

याबाबत बोलताना, महापालिका शिक्षण विभागाच्या सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान म्हणाल्या की, ''उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. शिक्षकांनी रविवारी घेतलेले विशेष कष्ट घेतल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वसाने परीक्षा दिली.'' अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशफाक शेख म्हणाले, ''उर्दू माध्यमाच्या दोन्ही परीक्षा केंद्रांवर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून नेमणूक होती. तरीही चांगले यश मिळविले.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories