शेअर्स मार्केट व आयपीओ मध्ये गुंतवणूकीवर नफ्याचे आमिष दाखवून ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. २१ - शेअर्स मार्केट व आयपीओ मध्ये गुंतवणूकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून, वेगवेगळ्या गुंतवणूक समूहात सहभागी करुन घेऊन एका इसमाला दोघांनी ३५ लाख २८ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना ३० मार्च २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत हिंजवडी येथील जॉयव्हिल शापुर्जी हौसीग प्रा.लि. कंपनीत घडली. आरोपींवर बुधवारी (ता. २०) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फसवणूक झालेल्या पुरुषाने तक्रार दिली आहे. आरोपी प्रतिमा बंन्सल व मयांक सचान (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम-भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चा कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० मार्च २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत जॉयव्हिल शापुर्जी हौसीग प्रा.लि. कंपनीत काम करताना प्रतिमा बनसल व मयांक सचान यांनी आपआपसांत संगनमत करुन फिर्यादीला विविध मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअॅप नंबरव्दारे फिर्यादीशी संपर्क केला व फिर्यादीला विवीध इनव्हेस्टमेन्ट ग्रुपमध्ये अॅड केले. विश्वास ठेवून फिर्यादीने केवायसी अपडेट केले. फिर्यादीला अॅपवर चालत असलेल्या शेअर्स मार्केट व आयपीओ यामध्ये तुम्ही जर जास्त पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हांला आम्ही शेअर्समध्ये व आयपीओ मध्ये चांगला फायदा करुन देवू असे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँकांच्या खात्यावर एकूण ३५ लाख २८ हजार रुपये घेतले पण नफा न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे.