राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी १५५ उमेदवार मैदानात, पुणे जिल्ह्यातील २५ उमेदवार
Mar 09 2026
123
राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी १५५ उमेदवार मैदानात, पुणे जिल्ह्यातील २५ उमेदवार
पुणे, ता. ९ - राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दीव, दमण येथील एकूण १५५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुणे जिल्हातील २५ वकील ही निवडणूक लढणार आहेत.
राज्य वकील परिषदेच्या या निवडणुकीत एकूण २५ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर आचारसंहिता प्रसिद्ध केली आहे. परिषदेसाठी सुमारे दोन लाख वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून २४ ते २५ हजार मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असल्याने महिला उमेदवारांमध्येही उत्साह आहे. २४ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पुढील सात दिवसांत मतदानानंतर मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.