महाराष्ट्रातील सांस्कृतिक-पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे १६ व १७ ऑगस्टला महाराष्ट्र सदनामध्ये आयोजन

महाराष्ट्रातील सांस्कृतिक-पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे  १६ व १७ ऑगस्टला महाराष्ट्र सदनामध्ये आयोजन

महाराष्ट्रातील सांस्कृतिक-पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे  १६ व १७ ऑगस्टला महाराष्ट्र सदनामध्ये आयोजन 

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात करण्यात आले आहे. कलाप्रेमींनी या अनोख्या सांस्कृतिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध कलावैभवाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले आहे. 

या उपक्रमांतर्गत रविवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रांगोळी कार्यशाळा, स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार गणेश खरे यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. संस्कार भारती, गालिचा, लॅंडस्केप, पोर्ट्रेट आणि पोस्टर रांगोळी अशा विविध शैलींच्या प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण सहभागी कलाकारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक रांगोळी कलेसोबत आधुनिक कलाशैलींची ओळख करून घेण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे.

सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘चतुरंग’ या विशेष सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे विविध कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories