महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील  सर्वाधिक आठ उमेदवार विजयी

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक आठ उमेदवार विजयी

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील  सर्वाधिक आठ उमेदवार विजयी

पुणे, ता. ८ - राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील  सर्वाधिक आठ उमेदवार विजयी झाले आहेत. 

२४ मार्च २०२६ रोजी झालेल्या या निवडणूकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक लढवत होते. यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण देण्यात आले. नागपूर येथील अॅड. पारिजात पांडे राज्यात पहिल्या क्रमांकाने निवडून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील अॅड. गणेश शिरसाट सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. पुणे जिल्ह्यात अॅड. राजेंद्र उमाप हे जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाने निवडून आले आहेत. महिला राखीव गटातून अॅड. रंजना भोसले आणि अॅड. माधवी पोतदार विजयी झाल्या आहेत.  

-जिल्हानिहाय विजयी उमेदवार -

- मुंबई - १, - ठाणे - १, - पुणे - ६, - सिंधुदुर्ग - १, - सोलापूर - १, - कोल्हापूर - १, - संभाजीनगर - २, - हिंगोली - १, - यवतमाळ - १, - नागपूर - २, - नाशिक - १

- पुण्यातील विजयी वकील -  अॅड. गणेश शिरसाट, अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. विठ्ठल कोंडे - देशमुख, अॅड. राजेंद्र अनभुले, अॅड. विकास ढगे-पाटील, अॅड. अहमदखान पठाण,  अॅड. रंजना भोसले,  अॅड. माधवी पोतदार





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories