राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली
पुणे, ता. 16 - महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गृह विभागाने शुक्रवारी (ता. १५) पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
या बदलानुसार आता, पुणे शहराच्या पोलिस सहआयुक्त पदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची पुण्यात गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त पदी रोहिदास पवार, संजय सरगौडा-पाटील व धीरज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी व विशाल गायकवाड यांची पुणे लोहमार्ग अतिरिक्त अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुभवी आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) पदावर आणि दत्ता कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
लखमी गौतम यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था या पदावर, मनोज शर्मा यांची मुंबईत सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था या पदावर, सुवेज हक यांची मुंबईत सहआयुक्त (प्रशासन) पदावर, महेश पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) या पदावर,
परमजित दहिया यांची दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर, सी. के. मीना यांची कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर, रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
पंकज देशमुख यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयात संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील फुलारी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संभाजी कदम यांची 'सीआयडी'मध्ये पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिम्मत जाधव यांची बृहन्मुंबईत पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पी. आर. पाटील, प्रशांत अमृतकर आणि सोलापूरचे उपायुक्त गौहर हसन यांची पुण्यात पोलिस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश चोपडे यांची पोलिस उपायुक्त सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
विक्रम देशमुख यांची पोलिस उपायुक्त मीरा भाईंदर, वसई विरार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शफकत आमना यांची पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे या पदावर, शुभम कुमार यांची अतिरिक्त अधीक्षक, पुणे ग्रामीण या पदावर आणि जयंत मीना यांची पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.