नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामे भुईसपाट
पिंपरी, ता. १६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'ह' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील अंदाजे १३० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ३ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईमध्ये उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने यांच्यासह १८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. एकूण १० मजूर, १ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर ब्रेकर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
''अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरु राहणार ''
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही सातत्याने सुरु राहणार आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करताना आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे आणि नियमांचे पालन करावे. अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- नियमांचे पालन, compliance, कठोर कारवाई, strict action, PMC orders, महापालिका प्रशासन, municipal administration
- , अतिक्रमणविरोधी कारवाई, anti-encroachment action, नागरिक मार्गदर्शन, citizen guidance,
- भुईसपाट, demolition,
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, अनधिकृत बांधकाम, illegal construction,
- नवी सांगवी, Navi Sangvi, प्रभाग ३१, Ward 31