news
clock
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण 

पुणे, ता. १४ - वाघोली येथे होणाऱ्या ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण व मानाच्या गदेचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झाले. यावेळी, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. 

'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोलीत होणार आहे. बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण यावेळी त्यांना देण्यात आले. समारोपाला उपस्थित राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पैलवान योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, आयोजक रामकृष्ण सातव, नगरसेवक अनिल सातव, कृष्णाजी बुचडे, नटराज सातव, सुनील जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories