news
clock
पुणे शहर पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी, राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या सूचना

पुणे शहर पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी, राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या सूचना

पुणे शहर पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी, राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या सूचना 

पुणे, ता. १७ - ''शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी. नागरिकांना तातडीने मदत मिळेल यासाठी अधिक सतर्क राहावे. सर्वसामान्यांमध्ये पोलिसांची विश्वासार्ह आणि संवेदनशील प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत.'', अशा सूचना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी शहर पोलिसांना दिल्या. त्यांनी पुणे शहर पोलिसांसोबत ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच घेतली. 

बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे पोलिस उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.  शहरातील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, नव्या ट्रेंड्स आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर दाते यांनी मार्गदर्शन केले. 

शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढती सायबर गुन्हेगारी, अल्पवयीन गुन्हेगारी, आणि वाहतूक या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली. गुन्ह्यांच्या तपासातील गती वाढवण्यासाठी व गुन्ह्यांची उकलही वेगाने व्हावी  यासाठी तपास यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे, अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत केवळ कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित न राहता त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करावे, त्यासाठी समुपदेशन, शिक्षण आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना दाते यांनी दिल्या.  पुणे शहर पोलिसांना कामकाजात काही अडचणी आहेत का ?, काही मदत हवी आहे का ?  याबाबतही सदानंद दाते यांनी जाणून घेतले.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories