प्राध्यापक पदासाठीच्या‘सेट’परीक्षेसाठी २ जूनपासून अर्ज प्रक्रिया

प्राध्यापक पदासाठीच्या‘सेट’परीक्षेसाठी २ जूनपासून अर्ज प्रक्रिया

प्राध्यापक पदासाठीच्या‘सेट’परीक्षेसाठी २ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, ता. २८ -  प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या  महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा २६ जुलै २०२६ रोजी होणार आहे. परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ जून २०२६ पासून सुरु होणार असून, नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२६ पर्यंत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) या शहरांतील केंद्रांवर घेतली जाईल. विद्यार्थ्यांना २ जून रोजी सकाळी ११ ते १६ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह १७ ते १९ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 

अर्ज केवळ https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरच उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज अचूक भरुन त्याची प्रत स्वतःकडे जतन करावी, ती कोठेही पाठवू नये. शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. ज्यांचे नाव यादीत नसेल, त्यांनी शुल्काचा पुरावा [email protected] वर ई-मेल करावा. एखाद्या विषयात आधीच उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना त्याच विषयात पुन्हा परीक्षा देता येणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि ‘सेट’चे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories