टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात
पुणे, ता. २७ - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)२८ जूनला होणार होती. मात्र, ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. खबरदारीचा उपाय उद्या, रविवारी (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भिवंडी येथे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचा संशय होता. त्यानंतर कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून धाड टाकण्यात आली. या कारवाईत संशयितांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
प्राथमिक तपासात संशयितांकडे आढळलेले काही प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाल्याचा संशय बळावला आणि कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- महाराष्ट्र टीईटी, Maharashtra TET, परीक्षा रद्द, Exam cancelled, परीक्षा पुढे ढकलली, Exam postponed
- पोलिस कारवाई, Police action, कोनगाव पोलिस ठाणे, Kongaon police station, भिवंडी, Bhiwandi, ठाणे, Thane
- टीईटी परीक्षा, TET exam, पेपर फुटी, Paper leak, प्रश्नपत्रिका लीक, Question paper leak, तीन जण ताब्यात, Three arrested,