यशवंतनगर झोपडपट्टीत विशेष समस्या निवारण शिबिर आयोजित करण्याची मागणी
पिंपरी, ता. २६ - यशवंतनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या प्रलंबित पुनर्वसन व घरकुलासंदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी मुंबईच्या धर्तीवर 'शासन आपल्या दारी' संकल्पनेअंतर्गत विशेष समस्या निवारण शिबिर आयोजित करावे, अशी मागणी येथील रहिवासी अमोल चौधरी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
याबाबत, चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना निवेदन दिले. प्रशासनाने थेट यशवंतनगर वस्तीत येऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा आणि पात्र झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी विशेष समस्या निवारण शिबिर आयोजित करावे, असे निवेदनात म्हटले आहे.