पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 

पुणे, ता. २२ - पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. विशेषतः पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ झाले असून विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, दक्षिण कोकण-गोवा किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागांत उष्णतेमुळे निर्माण झालेल्या स्थानिक हवामान बदलाचा परिणाम दिसून येत आहे. अचानक ढग दाटून येणे, विजांचा कडकडाट आणि अल्पावधीत मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता  आहे.

 राज्याच्या पश्चिम व दक्षिण भागात हा पाऊस पडेल. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा पट्टा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन ते तीन तासांत मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा अंदाज आहे.

नागरिकांनी वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी.  विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आसरा न घेणे आणि आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल व जनावरांच्या सुरक्षितेची खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories