'पीएमआरडीए'च्या आकुर्डी मुख्यालयात  दहशतवादविरोधी दिनानिमित्त समाजात शांतता, बंधुभाव टिकावण्याठी घेतली सामूहिक शपथ

'पीएमआरडीए'च्या आकुर्डी मुख्यालयात दहशतवादविरोधी दिनानिमित्त समाजात शांतता, बंधुभाव टिकावण्याठी घेतली सामूहिक शपथ

'पीएमआरडीए'च्या आकुर्डी मुख्यालयात  दहशतवादविरोधी दिनानिमित्त समाजात शांतता, बंधुभाव टिकावण्याठी घेतली सामूहिक शपथ 

पिंपरी, ता. २२ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात गुरुवारी (ता. २१) जागतिक दहशतवाद विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सर्वांनी संघटितपणे याविरुद्ध लढा देण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. या निमित्ताने सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दहशतवादविरोधी सामूहिक शपथ घेतली. 

याप्रसंगी सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, सहवित्तीय नियंत्रक सविता नलावडे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त (प्रभारी) हिंमत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

समाजात शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असेल, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात ही शपथ ग्रहण केली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories