थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, ता. ११ - थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ११) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड विभाग आणि समरसता गतिविधि यांच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन स्मारकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन कार्य तसेत त्यांनी इतर समाज प्रबोधनाच्या कार्याला उजाळा दिला
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगवी गट संघचालक लक्ष्मणजी पवार, मातंग साहित्य परिषदेचे डॉ. धनंजयजी भिसे, धनंजय खुडे, संत तुकाराम नगर कार्यवाह आणि संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते