ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आमदार महेश लांडगे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’जाहीर

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आमदार महेश लांडगे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’जाहीर

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आमदार महेश लांडगे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’जाहीर 

पिंपरी, ता. १८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.  ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आमदार लांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पुरसकार वितरण सोहळा येत्या रविवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. ‘सावरकर समजून घेताना’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माजी सनदी अधिकारी तथा ‘चाणक्य मंडळ परिवाराचे’ प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.

आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्याच्या विविध विषयांवरील दौरे आता संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या याच ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवरील अखंड कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात येत आहे, अशी माहिती संयोजक राजन लोणकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

या सोहळ्याला आणि व्याख्यानाला पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील तमाम राष्ट्रभक्तांनी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories