news
clock
शेजाऱ्यांकडून ४० वर्षीय इसमाला मारहाण, मोई येथील घटना

शेजाऱ्यांकडून ४० वर्षीय इसमाला मारहाण, मोई येथील घटना

शेजाऱ्यांकडून ४० वर्षीय इसमाला मारहाण, मोई येथील घटना 

पिंपरी, ता. १६ - नातेवाईकांशी काहीतरी बोलण्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या तिघांनी मिळून एका ४० वर्षीय इसमाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील मोई येथे  १४ एप्रिलला रात्री ११ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकुमार भिमराव बिळकेरे (वय ४०, खाजगी नोकरी, सध्या रा. खेड, मूळ रा. चळकापूर, ता. भालकी, जि. बिदर) हे आपल्या कामानिमित्त बाहेर असताना शेजारी राहणारे आरोपी शरण बसप्पा सुभाष अनाकल (वय ३१), मालश्री अनाकल आणि सिद्धू माडगुळी (सर्व रा. मोई, ता. खेड) यांनी त्यांना अडवून वाद घातला.

आरोपीने फिर्यादी नंदकुमार यांना त्यांच्या कुटुंबीयांबाबत विचारणा करुन वाद सुरु केला. त्यानंतर एका आरोपीने  “तुला सोडणार नाही, कशात तरी अडकवू” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि नंदकुमार यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे नंदकुमार खाली पडले असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.शरण अनाकल याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या कपाळावर मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १५) भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories