news
clock
सिमेंटचा गट्टू फेकून युवकाला केले जखमी

सिमेंटचा गट्टू फेकून युवकाला केले जखमी

सिमेंटचा गट्टू फेकून युवकाला केले जखमी 

पिंपरी, ता. १६ - चार जणांच्या टोळक्याने १८ वर्षीय युवकाला सिमेंटचा गट्टू फेकून मारुन गंभीर जखमी केले व युवकाच्या नातेवाईकांनाही मारहाण केली. ही घटना १४ एप्रिलला नेहरुनगर पिंपरी येथील संतोषी माता चौकात घडली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, जखमी झालेला युवक दानिश आरिफ शेख (१८ वर्षे, रा. नेहरुनगर) याने संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या मारहाणीमध्ये शहाबाज उर्फ टिपु शहा (वय ३० वर्षे रा. नेहरुनगर), इर्रशाद शहा (वय ३२ वर्षे, रा. भोसरी ब्रिजच्या खाली), सूरज उर्फ आसीफ शेख (वय २१ वर्षे, रा. नेहरुनगर) व रामा दुर्गाअप्पा चौधरी (वय २५ वर्षे, रा. नेहरुनगर) हे आरोपी आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

फिर्यादी दानिश याचे होणारे दाजी फरहान अकबर खान यांना आरोपींनी  शिवीगाळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी पळून गेले. त्यानंतर, त्यांनी दानिश व त्यांच्या वडिलांना मारहाण केली. दानिशला त्यांनी खाली पाडले व रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून "इसको अब खत्म कर देंगे" असे म्हणत तो सिमेंटचा गट्टू दानिशच्या तोंडावर फेकून मारला. त्यामुळे त्याच्या नाकास गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories