मावळात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी द्यावी - राज्यमंत्री बाळा भेगडे
पिंपरी, ता. ८ - मावळ तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हिंजवडी ते तळेगाव एमआयडीसी आणि निगडी ते लोणावळा शहर या दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना राज्य शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाळा भेगडे यांनी याबाबच चर्चा केली. हिंजवडी ते तळेगाव एमआयडीसी आणि निगडी ते लोणावळा शहर या दोन्ही प्रकल्पांमुळे मावळ तालुक्याचा कायापालट होईल. मावळ तालुक्यात लोणावळा, खंडाळा भागात वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळेच याभागात पर्यटनवाढीसाठी असलेला पाहता, निगडी ते लोणावळा दरम्यान मेट्रो सुरु झाल्यास प्रवाशांना जलद, सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
हिंजवडी आयटी पार्क ते तळेगाव, नवलाख उंब्रे एमआयडीसी हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा पट्टा असून, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार, कर्मचारी व द्योजकांची ये-जा सुरु असते, त्यांनाही मेट्रो झाल्यास सोयीचे होईल, असे बाळा भेगडे यांनी सांगितले.