शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन ३८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, ६ जणांना अटक

शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन ३८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, ६ जणांना अटक

शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन ३८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, ६ जणांना अटक 

पिंपरी, ता. २० - शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन ३८ वर्षीय तरुणाला सहा जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. ही घटना मावळ तालुक्यात शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणी योगेश दगडु वाघोले (वय ३८ वर्षे, व्यवसाय - शेती, रा. ता. मावळ) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी १) शरद वाघोले, २) रेखा वाघोले, ३) छाया वाघोले, ४) नवनाथ वाघोले, ५) यश वाघोले, ६) स्वप्नील वाघोले (सर्व रा. ता. मावळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

फिर्यादी योगेश वाघोले हे शेतात काम करीत असताना आरोपी शरद वाघोले याने शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन योगेशला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी रेखा वाघोले व छाया वाघोले यांनी वाईट शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपी नवनाथ वाघोले याने हातातील काठीने योगेशच्या उजव्या हातावर, आरोपी यश वाघोले याने लोखंडी रॉडने, तसेच आरोपी स्वप्नील वाघोले याने हातातील काठीने योगेशला  मारुन जखमी केले आहे. 

आरोपींवर शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१),११५(२),१८९ (२),१८९(३),१८९ (४),१९०,१९१,३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories