गांजा बाळगणाऱ्या तरुणाला काळेवाडीतून अटक
पिंपरी, ता. २० - बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडीतून अटक केली आहे. त्याच्याकडून २५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
आरोपी व्यंकटेश सुरेश नाईक (वय २६ वर्षे, रा. काळेवाडी) याने एकुण १२,९००/-रु किंमतीचा एकूण २५८ ग्रॅम गांजा बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी आरोपीच्या काळेवाडीतील भारत माता चौक-जयहिंद कॉलनीमधील घरी जाऊन कारवाई केली.
आरोपी विरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिस कारवाई, Police Action, एन.डी.पी.एस. अॅक्ट, NDPS Act,
- जप्त, Seized, भारत माता चौक, Bharat Mata Chowk, जयहिंद कॉलनी, Jaihind Colony,
- , बेकायदेशीर विक्री, Illegal Sale, अंमली पदार्थ विरोधी पथक, Narcotics Department,
- पिंपरी, Pimpri, काळेवाडी, Kalewadi, अटक, Arrest, तरुण, Young Man, गांजा, Cannabis,